ताज्या घडामोडी

दिशा महिला बचतगटाच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात साजरी

Spread the love

तळेगाव: तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात कार्यरत असलेल्या दिशा महिला बचतगट सदस्यांची सहकारी पतसंस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कै.अनंतराव चाफेकर सभागृह यशवंत नगर येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली .

तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शर्मिलाताई शहा यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेस दिशा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार, उपद्याक्ष यशवंत लिमये, खजिनदार इंदू गुप्ता, संथेचे कायदेशीर सल्लागार अॅड. ओमकार आरते, दिशा पतसंस्थेच्या संचालिका सौ मीना गुडगुल आणि वर्षा जांभूळकर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सौ ज्योती गोखले यांनी केले. दिशा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार यांच्या १९६२ आणि १९७१ च्या युध्यातील आठवणीना उजाळा देत, त्यांचा सन्मान करण्यात आला.संस्थेच्या व्यवस्थापिका सौ अरुणा पवार व सेक्रेटरी सौ वासंती फडतरे यांनी केले.

यानंतर दिशा पतसंस्थेच्या काही यशस्वी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील मुलींना दिशातर्फे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी बचत गटाचे महत्व, व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचे महत्व सांगितले. दिशा पतसंस्थेने उतरोत्तर प्रगती करावी व उंच शिखर सर करून आपले स्थान उंच करावे अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. रघुनाथ जठार यांनी व्यक्त केली.

सभेला महिला सदस्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. सौ कमल गावडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व सभासदांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!