ताज्या घडामोडी
मावळात होळीचा सण उत्साहात साजरा
मावळ : मावळ तालुक्यात दोन वर्षानंतर होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या सावटामुळे मागील दोन वर्षात होळी साधेपणाने साजरी केली जात होती. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच निर्बंध शिथिल झाल्याने मावळवासिंयामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.

शहरी भागात चौकाचौकात तसेच सोसायट्यांमध्ये तर ग्रामीण भागात गावातील मंदिरांसमोर होळी साजरी करण्यात आली.



