ताज्या घडामोडी

हॅण्ड इन हॅण्ड संस्थेच्या वतीने महिला बचत गटांना स्टेशनरी किट वाटप

Spread the love

भोयरे : तळेगाव दाभाडे येथील हॅन्ड इन हॅन्ड या संस्थेमार्फत भोयरे गावातील 14 महिला बचत गटांना स्टेशनरी साहित्य कीट  वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये गणयंत्र (कॅल्क्युलेटर) स्टेपलर, खोडरबर,पेन पॅक, पट्टी, व्हाइटनर,शॉपनर,  ग्लूस्टीक व इंकपॅड या रेकॉर्डसाठी अवश्य अकरा वस्तूंचा किटमध्ये समावेश आहे.

या सर्व साहित्यांचा वापर करून महिलांना बचत गटाच्या रेकॉर्डमध्ये अचूकता व पारदर्शकता कशी आणता येईल व संस्थेने स्थापन केलेल्या शिवशक्ती ग्राम संघाच्या माध्यमातून महिलांनी केलेल्या बचतीतून गावात जास्तीत जास्त व्यवसाय कसा करता येईल याविषयी सारिका शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी गावचे विद्यमान सरपंच बळीराम भोईरकर ग्रामसेविका प्रमिला सुळके हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचे अभिजीत अब्दुले, सारिका शिंदे, गौरी करवंदे व पंढरीनाथ बालगुडे तसेच गावातील सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव व गटातील सदस्या उपस्थित होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!