*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे आयोजित संत संमेलनाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार*

मुंबई – (सखाराम कुलकर्णी) अखिल भारतीय बहु भाषिक ब्राह्मण महासंघ शाखा नांदेड यांनी ११ मे २०२३ रोजी आयोजित केलेल्या संत संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण सौ. अमृताताई फडणवीस यांनी स्वीकारून बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या पाठीशी सदैव उभी राहील असे आश्वासन आज निमंत्रण स्वीकारताना महासंघाच्या शिष्टमंडळास दिले.
अखिल भारतीय बहु भाषिक ब्राह्मण महासंघ समाजासाठी विविध उपक्रम राबवत असून २३ एप्रिल रोजी रोजगार मेळावा, १० मेला सामुदायिक उपनयन संस्कार ,तर ११ मे ला संत संमेलन आयोजित केला आहे.

या संत संमेलना साठी महाराष्ट्रातील व इतर राज्यातील संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. संतांचे दर्शन व विचार ऐकण्याचे भाग्य नांदेडकरानां लाभले आहे. या संत संमेलनच्या उद्घाटनाचे निमंत्रण सौ.अमृताताई फडणवीस यांना देण्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे नांदेड जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.सुमती व्याहळकर प्रा.रमाकांत जोशी चिखलीकर, युवाध्यक्ष साकेत खोचे प्रसिद्धी प्रमुख सखाराम कुलकर्णी यांनी सागर मुंबई या निवासस्थानी जावून निमंत्रण दिले.

हे निमंत्रण त्यांनी स्वीकारून बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या पाठीशी मी सोबत राहील असे आश्वासनही दिले. व महासंघाच्या या तिन्ही कार्यक्रमाचे कौतुक करून असे उपक्रम राबवल्याबद्दल महासंघाला शुभेच्छाही दिल्या. समाजाला जागृत करण्यासाठी व ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी आज अशा उपक्रमाची गरज आहे असे ही विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले.



