ताज्या घडामोडी

आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी

Spread the love

तळेगाव दाभाडे : आमदार सुनिल शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उद्योजक मधुकर शेळके, उद्योजक सुधाकर शेळके, उद्योजक संदीप गराडे, गोकुळ किरवे, सुधाकर रेम्भोटकर व कार्यालयीन प्रतिनिधी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आमदार शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी शिवगर्जना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

या प्रसंगी बोलताना उद्योजक सुधाकर शेळके म्हणाले कि,प्रत्येक दिवस महत्वाचा असतो.प्रत्येक क्षणी सत्कर्म करत रहावे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट समाजासाठी आदर्श व अनुकरणीय आहे. महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता. स्वराज्याच्या या भूमीत जन्म घेणे हे आपले भाग्य आहे. जीवनात संघर्ष करताना छत्रपती शिवाजी महाराज्यांचे विचार आत्मसात केल्यास आपण कधीच अपयशी होणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!