ताज्या घडामोडी

चिंचवड रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी यांचे फलक लावावे, चिंचवड प्रवासी संघाची मागणी

आजपासून बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी (9 ऑगस्ट 1942) रोजी चिंचवड रेल्वे स्थानकावर आज बरोबर 80 वर्ष झाली, महात्मा गांधीजी याच दिवशी आले होते चिंचवडला महात्मा गांधी यांचे पाय लागले होते.

Spread the love

चिंचवड रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी यांचे फलक लावावे, चिंचवड प्रवासी संघाची मागणी..

आवाज न्यूज: गुुलामअली भालदार. चिंचवड 09 ऑगष्ट.

पिंपरी-चिंचवडचा स्वातंत्र्यलढ्याशी व स्वातंत्र्यपूर्व आंदोलनामध्ये सहभाग असल्याच्या अनेक घटना इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. यापैकी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आजपासून बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी (9 ऑगस्ट 1942) रोजी चिंचवड रेल्वे स्थानकावर आज बरोबर 80 वर्ष झाली, महात्मा गांधीजी याच दिवशी आले होते चिंचवडला महात्मा गांधी यांचे पाय लागले होते.

या घटनेमागची पार्श्वभूमी अशी की, 8ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे महात्मा गांधी यांनी चले जाव हा चळवळीचा इशारा ब्रिटिशांना दिला. आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभरातून आंदोलनाला सुरुवात झाली. ब्रिटिश प्रशासन( इंग्रज) हादरले. संपूर्ण देशातील नागरिक पेटून उठल्याने इंग्रजांनी या आंदोलनाची व्याप्ती वाढू नये, म्हणून गांधीजींना मुंबईतच अटक केली. वातावरण स्थिर होईपर्यंत गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्याचा निर्णय इंग्रज पोलिस अधिकार्‍यांनी घेतला. 8 ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या एका पॅसेंजर गाडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गांधीजींना बसवण्यात आले. गांधीजींना अटक केली असून पुण्यात आणले जाणार… ही बातमी वार्‍याच्या वेगाने सर्वत्र पसरली. मग स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटून उठलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे स्टेशनवर इंग्रजांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्याची तयारी सुरू केली. पुण्यात गर्दी होऊन गडबड होऊ शकते, याची चाहूल इंग्रज पोलिस अधिकार्‍यांना लागली, मग आपल्या प्लॅनमध्ये बदल करत पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी पॅसेंजर गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर येताच गांधीजींना तिथे उतरवण्यात आले. अनपेक्षित पणे गांधीजी चिंचवडला उतरलेले पाहून मोजक्या कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन झाले. चिंचवड रेल्वे स्थानक ते पुणे मुंबई महामार्ग या तीन मिनिटांचे अंतरामध्ये खाण परिसर असल्याने मोठमोठे दगड होते व बैलगाडी जाईल इतकीच कच्ची वाट होती. चालत चालत गांधीजींना महामार्गावर आणल्यानंतर तिथून एका मोटारीत बसून पुण्याकडे नेण्यात आले. या प्रसंगाची आठवण म्हणून रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरील दुतर्फा बाजूला प्रवासीयांना माहिती व्हावे. यासाठी या स्थानकावर महात्मा गांधीजींचे पाय लागले होते अशी आठवण असलेला बोर्ड लावला होता. मागील काही वर्षापर्यंत हा बोर्ड येथे होता.

नंतर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करताना हा बोर्ड रेल्वे प्रशासनाच्या वतीने काढून टाकण्यात आला. नुकतेच जुन महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधीस्थळ व क्रांतीवीर चापेकर बंधूच्या स्मारकाची रेल्वे प्रवाशांना माहिती व्हावी, यासाठी चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने फलक लावण्यात आले.
दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना हा बोर्ड पुन्हा लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आज चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व पत्रकार विजय जगताप यांनी आज चिंचवडचे स्टेशन मास्तर एन. जी. नायर यांना आज दिले. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डीआरएम रेणू शर्मा यांना ईमेलद्वारे चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संगीता जाधव, सुरज आसदकर, मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा, निर्मला माने, हार्दिक जानी, नयन तन्ना, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वतीने मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!