आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीरशैव सेवा संघ सोलापूर च्या वर्धापन दिनानिमित्त युवा संशोधक राहुल बुऱ्हानपुरे यांचा सत्कार संपन्न…..!

Spread the love

सोलापूर:- वीरशैव सेवा संघ सोलापूर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात *युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपूरे* यांचा सत्कार ॲड.राजशेखर बिराजदार पाटील, सामाजिक कार्यकर्ते .राजु होशेट्टी, ॲड.मल्लिनाथ शाबादे, आप्पासाहेब नष्टे,विश्वनाथ आमणे,राजशेखर बुरकुले, चंद्रकांत चोळके, यांच्या उपस्थितीत करण्यात आला .

यावेळी वीरशैव सेवा संघाचे *संस्थापक सचिव . सिद्धारुढ निंबाळे* यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात प्राचार्य .बसुदे पाटील सर,.घोंगडे सर, रविंद्र आमणे आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना  राहुल बुऱ्हाणपूरे बोलताना म्हणाले की,मला मागील दहा बारा वर्षे सतत परिश्रम घेतल्याने हे यश मिळाले आहे.माझ्या या संशोधनामुळे भविष्यात प्रत्येक चार चाकी वाहनधारकांचे दरमहा किमान ३ ते ४ हजार रुपयांची बचत होणार आहे.मला या पेटंट साठी इतर कंपन्यांनी ऑफर दिली होती पण टाटा मोटर्स ही भारतीय कंपनी असल्यानेच या कंपनीला पेटंट दिले आहे व याचा मला अभिमान आहे असे म्हटले.
कार्यक्रमास शिवानंद सावळगी, संजय लोणी, सिद्धाराम कोनापुरे,सचिन कुलकर्णी, राजु मुजगोंड, व अनुभव प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी तसेच मित्र परिवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!