ताज्या घडामोडी

जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी पूर्व तपासणी नोंदणी शिबिराचे तळेगावात आयोजन

Spread the love

तळेगाव दाभाडे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यातील जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यक साधने व कृत्रिम अवयवांच्या मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे शुक्रवारी (दि.७) व शनिवारी (दि.८) सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत तळेगाव दाभाडे येथील नथूभाऊ भेगडे शाळेच्या प्रांगणात आयोजन केले आहे. तालुक्यातील जेष्ठ व दिव्यांग नागरिकांनी या पूर्व तपासणी नोंदणी शिबिरात सहभागी होऊन वयोश्री व एडीप योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.

६० व त्यापुढील वयाच्या जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिरात तपासणी व नोंदणी करून जेष्ठ नागरिकांच्या गरजेनुसार त्यांना चालण्याची काठी,कोपर काठी, अल्युमिनियम कुबड्या, चार पायांची काठी, घडीचे वॉकर, चष्मा, श्रवण यंत्र, फोल्डिंग व्हील चेअर, कृत्रिम दात, कमोड व्हील चेअर, पायाची काळजी संच, संपुर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा आदि साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

तसेच दिव्यांग नागरिकांसाठी एडीप योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी दिव्यांगांची पूर्व तपासणी व नोंदणी करू त्यांना त्यांच्या आवश्यकते नुसार व्हील फिल्डिंग चेअर, विविध प्रकारच्या चेअर, श्रवण यंत्र, तीनचाकी सायकल, विविध कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र,आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!