ताज्या घडामोडी

मावळ पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक स्थगित

Spread the love

वडगाव : मावळ पंचायत समिती उपसभापती पदाची आज होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी संदेश शिर्के यांनी तसा आदेश दिला आहे अशी माहिती मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी पत्राद्वारे दिली.

पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी गुरुवार (30 डिसेंबर रोजी )निवडणूक घेण्यात येणार होती.उपसभापती पदाची निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मावळ पंचायत समितीला दिले होते. परंतु उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामविकास मंत्री विभाग यांच्याकडे अपील दाखल केलेले आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत सदरची निवडणूक स्थगित करावी असा निर्णय दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!