ताज्या घडामोडी

केज तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी ॲड. अजमेर शेख यांची निवड

भरारी न्युज. केज केज तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी ॲड. अजमेर शेख यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व राज्यसभा सदस्य खा. रजनीताई पाटील यांच्या हस्ते तसेच माजी मंत्री अशोकराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल सोनवणे आणि अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. अजमेर शेख हे सामाजिक भान असलेले, सर्वसामान्यांसाठी नेहमीच कार्यरत राहिलेले युवक म्हणून ओळखले जातात. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य असून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार वाचनालय उभारणे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शेतकरी, गोरगरीब व अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या अशा नेतृत्वाला काँग्रेस पक्षात कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचा माहोल दिसून येत आहे. होळ गावासह संपूर्ण तालुक्यातून ॲड. अजमेर शेख यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शेप, केज तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रवीण खोडसे, विश्वजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ॲड. अजमेर शेख यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!