आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

*सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वक्ता सेलच्या अध्यक्षपदी नागनाथ कदम यांची निवड, निवडीचे पत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान*

Spread the love

सोलापूर:- सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वक्ता सेलच्या अध्यक्षपदी नागनाथ कदम यांची निवड करण्यात आली. आज रोजी जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता येथे त्यांच्या निवडीचे पत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महाराष्ट्र प्रदेश वक्ता सेलचे अध्यक्ष गणेश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

यावेळी , जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, अंबादास गुत्तिकोंडा, अंबादास बाबा करगुळे, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड़, मल्लीनाथ सोलापुरे, विवेक कन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!