ताज्या घडामोडी

लेखक आणि दिग्दर्शक हर्षल आल्पे यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स पुणे तर्फे सेवा रत्न पुरस्कार प्रदान

मॅक्स लाईफ इन्शुरन्स चे उपाध्यक्ष अमेय मोहिते यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

Spread the love

लेखक आणि दिग्दर्शक हर्षल आल्पे यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स पुणे तर्फे सेवा रत्न पुरस्कार प्रदान

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, ३० सप्टेंबर.

आपल्या तळेगाव मधील रहिवासी असलेले कलाकार, लेखक तसेच दिग्दर्शक हर्षल विनोद आल्पे यांना यंदाचा मॅक्स लाईफ इन्शुरन्स पुणे 11 तर्फे दिला जाणारा कलेतील सेवेसाठी सेवा रत्न पुरस्कार मॅक्स लाईफ इन्शुरन्स चे उपाध्यक्ष श्रीयुत अमेय मोहिते यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

अधिक उत्तमोत्तम कलाकृती हातून घडवण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी असल्याचे मत हर्षल आल्पे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.तसेच समाजासाठी निरपेक्ष भावनेने काम करण्याची पोचपावती तसेच या पुरस्कारातून इतरांना ही प्रेरणा मिळावी ही अपेक्षा मोहिते यांनी व्यक्त केली.

तसेच या पुरस्काराबरोबरीने कोविड च्या महामारी त शर्थीने कोरोना योद्धा म्हणून सक्षम पणे जीवाची पर्वा न करणारे समाज सेवक तसेच व्हॉइस ओव्हर कलाकार, संजय हिरवे यांना ही समाज सेवेसाठी समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.

.फाईन आर्ट्स कलाकार महेंद्र काकडे यांना चित्रकलेसाठी तसेच उद्योग क्षेत्रासाठी साने इडली सेंटर चे प्रमुख आमोद साने यांना या प्रसंगीसेवा रत्न पुरस्कार देण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!