आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमंगल पतसंस्था रेल्वेलाईन शाखा यांच्यातर्फे पत्रकार दिन साजरा…..!

पुण्यनगरी चे उपसंपादक भरतकुमार मोरे, सादिक इनामदार,दै.लोकवार्ताचे सोमनाथ गायकवाड,लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे, एस न्यूज मराठी चैनलचे शिवानंद जाधव यांचा सन्मान.......!

Spread the love

सोलापूर:- मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज लोकमंगल पतसंस्था रेल्वेलाईन शाखा यांच्यातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी लोकमंगल परिवाराच्या विविध क्षेत्रातील कामाची चर्चा करण्यात आली, लोकमंगल परिवार लोकहिताच्या प्रत्येक कामाबद्दल अतिशय अनुकूल असते आणि ते पुढाकार घेऊन आपली सामाजिक जबाबदारी कशी पार पाडते याबद्दल विभागीय अधिकारी सरोजिनी निकम यांनी माहिती दिली, यावेळी संपादक आणि पत्रकारांनी लोकमंगल परिवाराच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी पुण्यनगरी चे उपसंपादक भरतकुमार मोरे व सादिक इनामदार,दै.लोकवार्ता चे सोमनाथ गायकवाड,लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे, एस न्यूज मराठी चैनलचे शिवानंद जाधव यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे सल्लागार मलप्पा जक्कपनवर , आरिफ हुसेन शेख , ॲड.सुवर्णा बाकळे, सुजाता मायाचारी तसेच विभागीय अधिकारी सरोजनी निकम , शाखाधिकारी चतुरसिंग बायस यांच्यासह किशोर सलवदे, संतोष माने,पद्माकर शिंदे, शिवगंगा होडगे, स्वाती मस्के आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!