ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अखेर काल अटक केली आहे. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.


गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख बेपत्ता होते.सोमवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले. दिल्लीहून काही अधिकारी देशमुख यांच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले. पुन्हा देशमुख यांची कसून चौकशी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही तब्येत आणी वयाची कारणे देत अनिल देशमुख ईडीसमोर जाण्याचे टाळत होते. त्यांच्या नागपूर,मुंबई व वर्ध्यातील घरावर ईडीने छापेमारी केली होती. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचा आरोप केला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!