आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाचलुचपतकडे चौकशीसाठी गेलेल्या त्या ४० अधिकाऱ्यात नांदेडच्या सौ.सविता बिरगे सह १२ महिलांचा समावेश. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी ED कडे जाणार….!.

Spread the love

मुंबई – (विधानसभेतून सखाराम कुलकर्णी)-शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार व लाच घेतल्याच्या प्रकरणावर शिक्षण आयुक्त पुणे यांनी ४० शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली .त्यात नांदेडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांचा २९ वा नंबर आहे. अशी माहिती विधानसभेत झालेल्या तारांकित प्रश्नाच्या चर्चेतून समोर आली . शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार व त्यांच्यावरील लाचेच्या प्रकरणी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे चौकशीची मागणी केली होती .याची बातमी ए. आर. न्यूज ने दि ९ जूनला प्रकाशित केली होती .त्या बातमीत शिक्षण आयुक्त यांनी लाचलुचपत विभागाकडे चौकशीची मागणी केलेल्या ४० अधिकाऱ्यात नांदेडचे शिक्षणाधिकारी आहेत असे भाकीत A.R . न्यूज ने केले होते. तर ते भाकीत खरे ठरले असून या ४० अधिकाऱ्यात नांदेड प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांचे नाव २९ नंबर वर त्या यादीत समाविष्ट आहे.

आता ही चौकशी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील उत्तरामुळे अंमलबजावणी संचालनाकडे चौकशी जाऊन बेहिशोबी मालमत्ता जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण विभागातील ४० अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर विधान सभेत बच्चू कडू, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, अबू आझमी, नाना पटोले, योगेश सागर, महेश शिंदे, सीमा अहिरे आदी सदस्यांनी विधान सभेत प्रश्न उपस्थित केला होता. या भ्रष्टाचारात ४० अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांचे कडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे. व याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत करण्याची मागणी शिक्षण आयुक्तांनी केली. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा देऊन आपल्या उत्तरात सांगितले की शिक्षणाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल सुधारणा करणे. त्यानुसार नवीन कायदा करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभाग व विधी व न्याय विभागाला दिले जातील. लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आलेल्या शिक्षणाधिकाऱ्यात नाशिकचे तीन, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड प्रत्येकी दोन व ठाणे येथील एक अधिकाऱ्याचा समावेश आहे. लाचलुचपत प्रकरणात सापडलेल्या यातील काही अधिकाऱ्यांची खुली अथवा गुप्त चौकशी करणे बाबत दि.१४-६-२०२३ रोजी दिलेल्या पत्रानुसार एकूण ३२ अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. यातील १७ अधिकाऱ्यांची उघड चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर उर्वरित अधिकाऱ्यांची उघड चौकशी सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यातील २९ अधिकार्‍याविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. व याची चौकशी अंमलबजावणी संचालकाकडे देऊन चौकशी त्यांच्या बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात येतील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात समस्यांना दिली.या ४० भ्रष्टाचारी अधिकार्‍यांत महिला मागे नसून १२ महिला अधिकाऱ्यांचा त्या ४० मध्ये समावेश आहे. महिलांनी अशा भ्रष्टाचारात अडकावे ही खंत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!