महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचारात वाढ
पवनानगर : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही माहीत नाही. पण राज्यात महिलांवरील अत्याचाराची लाट आहे. महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आणि त्यांचे बगलबच्चे खुलेआम महिलांवर अत्याचार करत आहे. आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांना पोलिसांची भीती. न कायद्याचा धाक. संजय राठोड सारख्या बलात्कार्याला वाचविण्याचे पाप महाविकास आघाडी करतेय अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर हल्ला चढवला.
मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या व विठू माऊली सोशल फाउंडेशनच्या वतीने लाठी काठी प्रशिक्षण समारोप समारंभात त्या बोलत होत्या.
माजी मंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,भास्कर आप्पा म्हाळसकर,ठाकर सर,ज्ञानेश्वर दळवी,राजाराम शिंदे,प्रशांत ढोरे,गुलाब म्हाळसकर, किरण राक्षे,गणेशराव गायकवाड,धनंजय वाडेकर,बाळासाहेब जाधव,सुनील चव्हाण,महिला अध्यक्षा सायलि बोत्रे,जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले,नितीन मराठे,सभापती ज्योति शिंदे,उपसभापती दत्ताभाऊ शेवाळे,निकिता घोटकुले,जिजाबाई पोटफोडे, सुवर्णा कुंभार,सुमित्रा जाधव,जितेंद्र बोत्रे,संदीप काकडे,नितीन घोटकुले,बाळासाहेब घोटकुले,,देवाभाऊ गायकवाड, गणेश ठाकर,मुकुंद ठाकर,ज्ञानेश्वर आडकर यांच्यासह पवन मावळातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




