ताज्या घडामोडी

सरस्वती विद्यामंदिरच्या दोन विद्यार्थिनी स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत

Spread the love

तळेगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्या वतीने 2020 -21 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर ,तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागाच्या संपदा गोविंद देशपांडे व  अनुजा संतोष ठुबे या दोन विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सुरेश झेंड, उपाध्यक्ष मा.श्री दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी मा.श्री अनंत भोपळे, कार्यवाह मा.श्री प्रमोद देशक,खजिनदार मा.सौ सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती सदस्य डॉक्टर ज्योती चोळकर, सदस्य मा.श्री विश्वास देशपांडे,मा.श्री सुनील आगळे,मा.श्रीमती अनुराधा तापीकर, मुख्याध्यापिका सौ. रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सौ सुरेखा रासकर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!