ताज्या घडामोडी

विकास एज्युकेशन & फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

शिवणे : पवन मावळातील शिवणे येथे विकास एज्युकेशन & सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज शिवणे येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरजू व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व नियमावलीचे पालन करत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना विकास लिंभोरे यांनी कोरोना संसर्गाच्या काळात ग्रामीण भागातील अनेक घरातील कुटुंबातील व्यक्ती बेरोजगार झाले असून अशा कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षात विद्यालयाचे आर्थिक मागास व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी दत्तक घेण्यात येणार असल्याची माहिती  दिली.

याप्रसंगी पोलिस वेल्फेअर देहूरोड शहराध्यक्ष व वक्ते लक्ष्मण शेलार ,स्वामी विवेकानंद विकास प्रबोधिनी संस्थेचे सचिव धनंजय टिळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयातील शिक्षक बळीराम औटे, स्नेहल शिवणेकर, स्नेहल कालेकर शिक्षकेतर कर्मचारी शशीकला शिंदे, आविष्कार मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास आडकर यांनी केले.तर आभार योगेश घोडके यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!