आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*’एसबीसी’चे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘जनजागरण’ आणि ‘परिसंवादाचे’ बैठक..*

*श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे आयोजन...*

Spread the love

सोलापूर :* मुंबई उच्च न्यायालयात विशेष मागास प्रवर्गाचे (SBC) २ टक्के असलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी *’युथ ऑफ इक्वालिटी’* या संस्थेने याचिका दाखल केले आहे.

सदरच्या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी *’शेवटची संधी’* म्हणून देण्यात आली आहे. *आरक्षण रद्द झाले तर, भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.* याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘एसबीसी’च्या *(SBC)* अस्तित्व टिकवण्यासाठी जनजागरण आणि परिसंवाद *रविवार, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ठीक शार्प १० वाजता* पूर्व भागातील श्री मार्कंडेय रुग्णालय जवळील *श्रीराम मंदिर* येथे आयोजन केले आहे.

याबैठकीत पद्मशाली समाजासह इतर समाजातील तज्ञ वकील बंधूंनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावेत आणि ‘एसबीसी’ समाजातील बंधू – भगिनीं, विद्यार्थी, एसबीसी अंतर्गत येणा-या शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावेत, अशी विनंती आणि आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!