ताज्या घडामोडी

कसब्यात ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी..

Spread the love

कसबात ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी..भाजपाच्या गडाला सुरुंग.Tunnel to BJP stronghold;

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २ मार्च.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि तब्बल २८ वर्षे भाजपच्या गड असलेल्या कसबा मतदारसंघात कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव करत महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे.

कसबा मतदारसंघात १३ व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ १२३ मते मिळाली आहेत.तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना केवळ ४ मते मिळाले आहेत. पुणेकरांनी या दोघांना नाकारलं आहे.

आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर १८ व्या फेरी अखेर ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. निकालापूर्वीच धंगेकरांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरवात केली आहे. कसबा पेठेत धंगेकरांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत आहेत.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुक पार पडली. यामध्ये मविआने कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. सुरुवातीपासूनच रविंद्र धंगेकर हे विजयी होतील अशी चर्चा होती.

आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून रविंद्र धंगेकर हे आघाडीवर होते. एकूण २० फेऱ्यांमध्ये धंगेकर यांनी ११०४० मतांची आघाडी घेत या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे २८ वर्षांपासून ताब्यात असलेल्या भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!