आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*दैनिक तुफान क्रांती च्या विभागीय उपसंपादक पदी नियुक्ती झाल्याने यशवंत पवार यांचा वटवृक्ष मंदिर समिती वतीने सत्कार*

Spread the love

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ व ध्यास समजून गेली अनेक वर्षापासून सांगोला जिल्हा सोलापूर येथील दैनिक तुफान क्रांती वृतपत्र सोलापूर जिल्हा सह इतर अनेक जिल्ह्यातील राजकिय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून ताज्या बातम्या आपल्या वाचकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पिढीत लोकांना शासन दरबारात न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी झिजवत असून कामचुकार व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर आपल्या लेखणी चा आसूड उगारून नेहमीच जागल्याची भूमीका पार पाडली आहे दैनिक तुफान क्रांती ने वृतपत्र चा व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून वृतपत्र चालवले असून जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून अनेक जिल्ह्यात परिचित असून केवळ सेवा म्हणून वृतपत्राने आपली प्रतिकूल परिस्थितीत दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे.

पत्रकारांचे कार्यसम्राट यशवंत पवार यांची सलग तिसऱ्यांदा विभागीय उपसंपादक पदी नियुक्ती झाल्याने यशवंत पवार अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ च्या दर्शनासाठी गेले असता वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान चे चेअरमन श्री महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!