आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अ. भा. विद्यापीठ स्पर्धेसाठी सौरभ कोळेकर याची निवड…..!

Spread the love

सोलापूर : तामिळनाडू येथे येत्या २ ते ४ जानेवारी दरम्यान आयोजित अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी सौरभ महावीर कोळेकर याची जलतरण या प्रकारात निवड झाली आहे.
मूळचा सोलापूरचा असलेला सौरभ कोल्हापूर येथे श्री जगद्गुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या होमिओपॅथी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ५० मी. फ्री स्टाईल, ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक व १५०० मी. फ्री स्टाईल या जलतरण प्रकारात त्याची निवड झाली आहे.
यापूर्वी सौरभने राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या निवडीबद्दल प्राचार्य राजकुमार पाटील, प्रशिक्षक जयसिंग पाटील (कोल्हापूर), श्रीकांत शेटे (सोलापूर) यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!