जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी अल्पदरात कार्डियाक रुग्णवाहिका सेवा..
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ने केली सुरु..
जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी अल्पदरात कार्डियाक रुग्णवाहिका सेवा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ने सुरु केली आहे.
आवाज न्यूज : जुन्नर प्रतिनिधी, १८ जानेवारी.

या सेवेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक १६.जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी आळेफाटा येथे संपन्न झाला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. या सेवेचे उद्घाटन शिरूर मतदार संघांचे लोकप्रिय खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

जुन्नर तालुक्यातील व परिसरातील गरजू लोकांना या सेवेचा लाभ होणार आहे,देवस्थान ट्रस्ट राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक खासदार यांनी केले. ओझर नं 1 च्या सरपंच मा. मथुराताई कवडे, ओझर नं 2 च्या सरपंच मा. तारामतीताई कर्डक, ग्रा.पं.सदस्या मीराताई जगदाळे यांनी खासदार साहेबांचे औक्षण केले.हॉस्पिटल प्रोजेक्ट साठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी आळेफाटा शहरातील नामाकिंत अकरा डॉक्टरांच्या शुभहस्ते नारळ वाढविण्यात आला.त्या मध्ये डॉ. डुंबरे, डॉ. कोटकर, डॉ. कुसबे, डॉ. उचगावकर, डॉ. वाणी, डॉ. वेठेकर, डॉ. पावले, डॉ. कराळे, डॉ. यादव, डॉ. टिपले, डॉ. डुंबरे, डॉ. भागवत, डॉ.कारंजकर, डॉ. पिंजारी, डॉ. तासकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत ऍम्ब्युलन्स सेवेचे गणेशपूजन करण्यात आले. 
यावेळी श्री. विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री. क्षेत्र ओझर चे अध्यक्ष मा. गणेशभाऊ कवडे, खजिनदार मा.कैलासदादा घेगडे, सचिव मा. दशरथ मांडे, विश्वस्त मा. आनंदराव मांडे, मा. मंगेश मांडे, मा. किशोर कवडे, मा. विजय घेगडे, ओझर नं 1 च्या सरपंच मा. मथुराताई कवडे, ओझर नं 2 च्या सरपंच मा. तारामतीताई कर्डक, तंटामुक्ती ओझरचे अध्यक्ष मा. दत्तात्रयदादा कवडे, ओझर नं 2 च्या ग्रामपंचायत सदस्य मा. मिरताई जगदाळे, मा. माऊलीशेठ कुऱ्हाडे, मा.मंगेश अण्णा काकडे, मा.संतोष चौगुले, मा. अविनाश डावखरं, मा. जीवनशेठ शिंदे, मा. निलेशशेठ डोंगरे, मा. विलासशेठ वाघुले, मा. विलाससेठ बनकर, मा. किशोरशेठ विधाटे,मा. संदिपदादा ताजने,मा.राहुल दादा रासने, मा.ऋषिकेशदादा भुजबळ,मा.निलेशशेठ भुजबळ मा.शुभम थोरात, मा. रोहित जाधव,पंचक्रोशीतील सर्वच डॉक्टर, मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार कैलासभाऊ घेगडे यांनी केले व आभार विश्वस्त मंगेशभाऊ मांडे यांनी मांडले



