आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ठेकेदार व महापालिका कर्मचाऱ्यांनी संगनमत करून घनकचरा वजनात घोळ करून महिन्याला ४५लाखाला महापालिकेला फसवले*. राज्यात असेच असण्याची शंका..?

Spread the love

नागपूर-(सखाराम कुलकर्णी ) नागपूर शहरातील घनकचरा गोळा करून डंम्पिंग गार्डवर कचरा टाकणाऱ्या ए.जी. इन व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड व बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या व महानगरपालिकेचे कर्मचारी संगणमत करून प्रत्यक्ष वजनापेक्षा जास्त वजन दाखवून जवळपास महिन्याला ४५ लाखाला महापालिकेला चुना लावत होते. हे उघड झाल्याने कंपन्याचे चालक-मालक व महापालिका कर्मचाऱ्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यांनी जास्तीचे घेतलेले हे पैसे दोन्ही कंपन्या व महापालिका कर्मचाऱ्याकडून वसूल करण्याची मागणी तक्रारदार डॉ. दीपराज इलमकर यांनी केली आहे.
नागपूर महापालिकेने शहरातील घनकचरा उचलून मौजे भांडेवाडी येथील डम्पिंग गार्ड वर टाकण्याचे काम ए. जी. इनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेड नागपूर व बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड नागपूर यांना दोन रुपये किलो या दराने दिले आहे. या कंपन्या व महापालिका संबंधित कर्मचारी वजनात घोळ करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे भंडारा तालुकाध्यक्ष डॉ. दीपराज इलमकर यांना मिळाली होती. त्यावर त्यांनी वैद्य मापन शास्त्र विभागीय कार्यालय नागपूर येथे तक्रार दिली. या तक्रारीवरून विभागीय सह नियंत्रक पांडुरंग बिरादार निरीक्षक प्र. रा. झोडापे व प्रदीप लांजेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत प्रत्यक्ष वजनापेक्षा जास्त वजन दाखवून व जास्त वजनाची पावती महापालिका कर्मचारी रीतसर संगणक पावती देत असल्याचे दिसून आले. व हा भ्रष्टाचार असा चालत होता की ए. जे .इनव्हायरो व बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या कंपन्या नागपूर शहरातून घनकचरा जमा करून डम्पिंग गार्ड वर टाकत असतात. रोज दोनशे ट्रक कचरा जमा होतो. हा कचरा महापालिकेच्या धर्म काट्यावर वजन केले जाते. नुकतेच पाच ट्रक चे वजन महापालिका धर्म काट्यावर केले व नंतर त्याच ट्रकचे वजन वेण्या वेब्रिज धर्म काट्यावर केले, असता २५० ते ३९० किलो वजनात फरक आढळून आला. याचा पंचनामा करण्यात आला. या जास्तीच्या वजन पावतीमुळे रोज जवळपास दीड लाखाचे व महिन्याला ४५ लाखाचे नुकसान महापालिकेला सहन करावे लागत होते. मागील सहा महिन्यापासून असा गोरख धंदा सुरू असल्याचे दिसून आले.या मुळे नागपूर महापालिकेचे आतापर्यंत २ करोड ७० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. धर्मकाट्यात घोळ व वीस किलो वजन ही जीर्ण स्वरूपाचे आढळून आले असून त्यावर वैद्यमापन शास्त्र विभागाचे स्टॅम्पिंग केले केले नाही .मात्र याची पडताळणी व योग्यतेचे प्रमाणपत्र वैद्यमापन शास्त्र वीभागाचे निरीक्षक विजय झोटे यांनी दिले असल्याचे दिसून आले .त्यामुळे पडताळणी करणारे वैद्यमापन शास्त्र विभागाच्या कार्यप्रणालीवर पण प्रश्न निर्माण होत आहे. तसेच महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. राजेंद्र महल्ले, विभागीय अधिकारी राठोड यांच्याही कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत असून यांचे व ए. जी .एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेड व बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड कंपनीशी प्रत्यक्ष वजनापेक्षा जास्त वजनाची पावती देण्याचे संगणमत आहे की काय असा संशय येतो. डॉ. दीपराज इलमकर यांनी तक्रार दिल्यावर उच्च स्तरावरून तपासणी झाल्यावर हा गैर कारभार, भ्रष्टाचार उघडकीस आला. विभागीय सह नियंत्रक बिरादार यांनी महापालिकेला नियम १३ (७ )१४ (३ )१५(५) अंतर्गत नोटीस देऊन सात दिवसात धर्मकाटा, वजन मापे अद्यावत करून त्रुटी दूर करण्याचे कळवले. पण आतापर्यंत मनपाचे २ कोटी ७० लाखाचे झालेले नुकसान कोणाकडून वसूल करायचे हा प्रश्न समोर येतो व यावर महापालिकेचे आयुक्त संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतील काय निर्णय घेतात तसेच पडताळणी करणारे निरीक्षक विजय झोटे यांचे विरुद्ध वैद्यमापन शास्त्र विभागाचे वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात अशा घनकचरा उचलण्याचे काम इतर ठेकेदारांना दिले आहेत तर तेथेही असाच घोळ गैरकारभार ,भ्रष्टाचार होत असेल का अशी शंका सर्वसामान्यातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!