ताज्या घडामोडी

शिवदुर्ग संस्थेला राज्याचे *पर्यटन व पर्यावरण मंत्री मा. ना.श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवकार्य पुरस्कार देवून सन्मान

Spread the love

लोणावळा ता.२९ ( प्रतिनिधी ) लोणावळ्यातील शिवदुर्ग संस्थेला राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा. ना.श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवकार्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे निवासस्थानी (वर्षा बांगला) शिवदुर्ग मित्र चा शिवकार्य पुरस्कार देऊन श्री . वसंत मोरे प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त गौरविण्यात आले.
ता.. १५ जुलै रोजी श्री वसंत मोरे प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने शिवदुर्ग मित्र च्या शोध व बचाव तसेच साहसी कार्याची दखल घेऊन श्री आदित्य साहेब ठाकरे मंत्री पर्यटन , पर्यावरण व वातावरणातील बदल आणि राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य , यांच्या शुभहस्ते मा मुख्यमंत्री निवास स्थान वर्षा बंगला याठिकाणी समारंभ पूर्वक हा शिवकार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री वसंत मोरे प्रतिष्ठान ने या वर्षी पासूनच हा पुरस्कार सुरू केला आहे , यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यात या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती मागवली होती शिवजयंती निमित्ताने दिला जाणारा पहिलाच पुरस्कार शिवदुर्ग मित्र ला मिळाला, ही अभिमानाची गोष्ट आहे. या साठी निवड समिती म्हणून ” महाराष्ट्र एडव्हेचर कौन्सिल ” या संस्थेने काम पाहिले,
यावेळी वसंत मोरे प्रतिष्ठानच्या सौ. हर्षलाताई आशिष मोरे , नगरसेविका मुंबई महापालिका, श्री आशिष वसंत मोरे, श्री जावेद शेख, श्री रोहित खैरे , विभाग अधिकारी युवासेना धरावी, श्री रोहित काळे, शाखा अधिकारी युवासेना शाखा १८९, श्री जॉन सांगळे, दूरदर्शन चे सुप्रसिद्ध निवेदक श्री कुणाल रेगे राजेश गाडगीळ , श्री फडके काका उपस्थित होते.
शिवदुर्ग च्या वतीने सचिव श्री सुनील गायकवाड, श्री आनंद गावडे , श्री राजेंद्र कडू व श्री गणेश गिध यांनी पुरस्कार स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia