आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावेत…..! 

अक्कलकोट दक्षिण पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचे आवाहन.....!

Spread the love

अक्कलकोट (प्रतिनिधी राजशेखर पवार )  विद्यार्थ्यानी अथक परिश्रमाने ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास संमृद्ध जीवन जगता येते असे मत अक्कलकोट दक्षिणचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी व्यक्त केले.

महर्षि विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या मैदर्गी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर संचालक मल्लिनाथ मसूती,दयानंद बमनळी,अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना मधून श्रम संस्काराचे धडे मिळतात. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व विकसित होते.तो श्रमाला लाजत नाही. व्यवहारी जीवन सुद्धा तो आत्मसात करू शकतो,म्हणूनच श्रमसंस्कार शिबिर महत्वपूर्ण असते.
कार्यक्रम आधिकारी प्रा.राजशेखर पवार यांनी मान्यवराचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले.आभार डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले कार्यक्रमास प्रा मनिषा शिंदे.प्रा.विद्याश्री वाले उपस्थित होते.

*मोबाईलवर श्रमदानाचे चित्रण करा*

आधुनिक युगातील युवक युवती मोबाईलवर जीवनाशी निगडित नसलेल्या प्रसंगाचे स्टेटस ठेवतात.त्यांनी तसे न करता पाट्या, कुदळ,घेऊन स्वतः श्रमदान करत असलेले प्रेरणादायी स्टेटस ठेवावे असा सल्ला पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia