ताज्या घडामोडी

वडगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ; 11 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

वडगाव : वडगाव मावळ पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करून रोख रकमेसह 11 लाख 59 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर  33 जणांना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांनी ही कारवाई गिरी पोल्ट्री जवळ मोरया कॉलनी वडगाव येथे काल( दि. 24) रोजी रात्री 8 वाजता केली.

विनय गंगाधर कुलकर्णी (वय 46 रा.तळेगाव दाभाडे) रामचंद्र अण्णा ढमाले (वय 48 रा. तळेगाव दाभाडे) पिंटू अशोक सुरवडे (वय ३० रा.वडगाव मावळ) निलेश भिकाजी बरमुख (वय 40 रा. तळेगाव) परमेश्वर वसंत सुरवसे (वय 44 रा. वारजे माळवाडी, पुणे) बाळासाहेब बाळकृष्ण बुटे (वय 50 रा. धामणे मावळ) रवींद्र शांताराम भेगडे (वय 51 रा. तळेगाव मावळ) अलगेज पीरे सामी ( वय 40 रा. देहूरोड मावळ) सईद इब्राहीम खान (वय 48 रा.कोंढवा पुणे) संजय भारत शेळके (वय 41 रा. वारजे माळवाडी पुणे) चंद्रकांत गुलाब वाघमोडे (वय 40 रा. कोंढवा पुणे) सचिन दत्तात्रय बारमुख( वय 40 रा. चांदखेड मावळ) अनिकेत नितीन गमरे (वय 23 रा. वडगाव मावळ) आकाश दत्तात्रय पडवळ (वय 31 रा. तळेगाव दाभाडे मावळ) संजय पांडुरंग घोजगे (वय 35 राहणार आंबी मावळ) मुरगन बलराम माणीकम (वय 37रा. देहूरोड मावळ) किसन नारायण नरवाडे (वय 45 रा. तळेगाव दाभाडे मावळ )सुरेश सिंधू शिंदे (वय 40 रा. कामशेत मावळ )अमोल गोविंदराव सोळूखे (वय 51 रा. येवलेवाडी कोंढवा पुणे) संतोष भाऊराव शिंदे ,(वय 38 रा. काळेपडळ हडपसर पुणे) बाळकृष्ण कुप्पुस्वामी मुदलियार( वय 42 या. देहूरोड कॅम्प) राजू सिताराम दरवडे (वय 44 रा.कान्हेवाडी खेड) बाळू भीमा गायकवाड (वय 38 रा.तळेगाव मावळ) अनिल दत्तात्रय काळोखे (वय 48 तळेगाव मावळ) भारत बंडू ओझरकर ( वय 47 राहणार ओझर्डे मावळ) अशोक नानाभाऊ बोराडे( वय 61रा. तळेगाव स्टेशन मावळ) मंगेश किसन बधाले (वय 32 राहणार बधालवाडी नवलाख उंबरे मावळ शंकर शांताराम घारे व 41 राहणार वडगाव मावळ) आदित्य गणेश भेगडे (वय 24 रा. भेगडे आळी तळेगाव मावळ) राहुल गुलाब येवले (वय 34 रा. कान्हेवाडी खेड) सचिन सुरेश गरुड (वय 30 या. तळेगाव मावळ ) अर्षद शब्बीर इनामदार  (वय 33 रा. तळेगाव स्टेशन मावळ) मंगेश भीमराव मोरे( वय 27 वडगाव मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सागर पांडुरंग वायकर व संतोष रामदास ढोरे हे आरोपी फरार आहेत.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ हद्दीत गिरी पोल्ट्री जवळ, मोरया कॉलनी ,संतोष रामदास गोरे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने वडगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ 33 आरोपींना अटक केली .चार चाकी वाहने 2, दुचाकी वाहने 3, मोबाईल 32, रोख रक्कम 25 हजार असा एकूण 11 लाख 59 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे पोलीस कर्मचारी सुनील जावळे, अजित ननावरे, आशिष काळे ,अमोल तावरे ,मनोज कदम ,अमोल ननावरे , शैलेश खोपडे, संजय तुपे, गणपत होले, अजय शिंदे ,अनिकेत बोराडे, शिवाजी कुटे आदींनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia