ताज्या घडामोडी

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त महिलांना पोस्टाची मोफत विमा पाॅलिसी

कै संजय उर्फ आवानाना प्रतिष्ठानचा उपक्रम

Spread the love

कार्ला:हिंदुह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती निमित्त कार्ला शाखेत कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठानचा वतीने कार्ला गावातील महीलांना पोस्टाची मोफत विमा योजना काढुन देण्यात आली.गावातील ६५ महीलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

तत्पूर्वी वडगाव न्यायालय बार असोसिएशनचा नवनियुक्त सचिव ॲडव्हेकॅट सुधाताई सचिन डिंबळे यांचा हस्ते व कार्ला ग्रामपंचायतीचा सरपंच दिपाली हुलावळे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच वडगाव न्यायालय बार असोसिएशनचा सचिवपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठान,कार्ला ग्रांमस्थ व कार्ला शिवसेना शाखेचा वतीने ॲड सुधाताई सचिन डिंबळे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,माजी सरपंच सागर हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,ग्रामपंचायत सदस्या वत्सला अविनाश हुलावळे,ग्रामपंचायत सदस्या सोनाली मोरे,प्रतिष्ठानचे सदस्य रमेश जाधव,सतीश मोरे,ॲड सुनिल पटेकर,विशाल जमदाडे,अजय मोरे, शैलेश चव्हाण,राजु सावळे,आदेश हुलावळे,बाबाजी सोंडेकर, टपालखात्याचे  अधिकारी सिध्देश्वर कांबळे, सावित्रीबाई फुले विधापीठ युवासेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे,ॲड सचिन डिंबळे,किरण गायकवाड,मंगेश हुलावळे,समीर हुलावळे, शाखा सन्मवयक विशाल वसंत हुलावळे,कैलास कुंडलिक हुलावळे, सचिन भिम हुलावळे,आदित्य हुलावळे,विनोद वसंत हुलावळे,अक्षय केदारी,आशिष हुलावळे,महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia