आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना ‘राजश्री शाहू महाराज समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

पाचोड, प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलन आणि दुसऱ्या परिवर्तनवादी लेखक संशोधक संगती राष्ट्रीय कार्यशाळा या भव्य कार्यक्रमात प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना ‘राजश्री शाहू महाराज समाजभूषण’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांचे विचार प्रभावीपणे समाजात रुजवणाऱ्या व्यक्तींना ‘राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार’ व ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. अशोकराव हजारे, साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. विजया गेडाम, संमेलनाध्यक्ष प्रा. समाधान दहिवाळ, माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. जयसिंगराव गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. कोठावळे यांना शाल, मानपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड येथे कार्यरत असलेले डॉ. कोठावळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य केले असून, मराठा आरक्षणाबाबत त्यांनी ठाम वैचारिक भूमिका मांडली आहे. त्यांच्या या कार्याची राज्यभरात दखल घेतली गेली. या यशाबद्दल संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, पैठणचे आमदार विलास बापू भुमरे, सभापती राजू नाना भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्यासह महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. शिवाजी यादव, डॉ. सुरेश नलावडे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. विलास महाजन, डॉ. भगवान जायभाय, डॉ. सुभाष पोटभरे, डॉ. उत्तम जाधव, डॉ. गांधी बानायत, डॉ. तुकाराम गावंडे, डॉ. ह. सो. बिडवे, प्रा. विनोद कांबळे, प्रा. संदीप सातोणकर, प्रा. सचिन कदम, डॉ. हेमंतकुमार जैन, प्रा. नितीन चित्ते, प्रा. अरुणा दसपुते, डॉ. विठ्ठल देखणे आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia