ताज्या घडामोडी

मावळ पंचायत समिती उपसभापती पदाची उद्या निवडणूक

Spread the love

वडगाव : मावळ पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी गुरुवारी (दि.30 डिसेंबर) रोजी निवडणूक होणार आहे.

डॉ. राजेंद्र देशमुख यांनी रिक्त पदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश मावळ पंचायत समितीला दिले आहेत. उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपच्या पाठिंब्यावर उपसभापती पद मिळवले होते. या विरोधात पंचायत समितीचे सदस्य साहेबराव कारके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ६ ऑक्टोबर रोजी दत्तात्रय शेवाळे यांचे सदस्यत्व रद्द केले त्यामुळे रिक्त असलेल्या पदासाठी निवडणूक होत आहे.

उद्या होणार्‍या उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!