आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रहार माहिती अधिकार पत्रकार फाउंडेशन संचलित माहिती अधिकारपत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे यांची नियुक्ती…..!

प्रहार माहिती अधिकार पत्रकार फाउंडेशन संचलित माहिती अधिकारपत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक तसेच पत्रकार संगप्पा गौतम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी या गावाचे रहिवासी आहेत, सामजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत तालुका, जिल्हा पातळीवर काम केले आहे.
सामजिक बांधिलकी जपत त्यांनी आतापर्यंत अनेक गरजूंना वेगवेगळ्या सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे, अनेक बेरोजगार युवकांना काम मिळवून दिले आहे, त्यांच्या या कामांची दखल घेत समितीने त्यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड केली आहे .या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेछ्याचा वर्षाव होत आहे.



