मायबाप अधिकारी शेतकरी जगला पाहिजे.. प्रफुल्ल भगवान ओव्हाळ .
शेत आणि शेतकरी, जगाचा पोशिंदा वाचला तरच मायबाप तुम्ही आम्ही वाचणार आहोत.
मायबाप अधिकारी शेतकरी जगला पाहिजे प्रफुल्ल भगवान ओव्हाळ .
आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, प्रफुल्ल ओव्हाळ मागील पाच वर्षांपासून पत्रकारिता करतो परंतु कालचा अनुभव हा फार वेगळा होता.
वेळ दुपारची 3.00 ते 3.30 ची,घटना होती मावळ तालुक्यातील करंजगाव पठार येथील,मला दुपारी 2.00 ला फोन आला, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा,मावळचे वंचितचे उपाध्यक्ष कमृध्दीन शेख आणि जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे आणि महेश परमार यांचा.’थोडे घाईचे काम आहे’असा .”एका शेतकऱ्याची 13 जनावरे मेली आहेत आणि त्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहोत”तुम्ही ही तेथेच या.तसा मी ही पोहोचलो,तक्रार दाखल करण्यात आली आणि मग सर्वानी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला वाटले होते की अंतर कमी असेल आम्ही कामशेत मधून निघालो अर्थात आमच्या दोनचाकी वरून थेट करंजगाव च्या दिशेने , पहिल्यादा तिकडे चाललो होतो त्यामुळे रोड बद्दल फारसे माहिती नव्हते.नेहमी चांगल्या रस्त्याने जाण्याची सवय त्यामुळे इथे ही चांगला रोड असेल हेच गृहीत धरले होते.आणि कमृध्दीन भाई आणि थिकडे आणि संतोषजी लोखंडे आणि महेश परमार हे त्यांच्या गाडीवर असे आम्ही करंजगाव च्या दिशेने निघालो,तोपर्यंत थिकडे आणि लोखंडे हे पुढे जाऊन पठारावर जाण्याच्या रोडवर जाऊन थांबले होते. आम्ही दोघे तिथे पोहचलो, आणि पहिला धक्का होता त्या रोड ची अवस्था पाहून.मी थिकडे यांना बोललो या रस्त्याने आपल्या ला वर जायचे आहे?
ते बोलले मी तर रोज सकाळी आणि संध्याकाळी ये जा करत असतो. ते ही 15 कीमी रोज;आम्ही पाहिले खरंच दोन्ही बाजूला किर्र झाडी आणि मध्ये फक्त चिखल ,मोठ्या मोठया खड्यात पाणी आणि कुठे कुठे निसरडी माती .आम्ही शेवटी गाडीवर चढाई सुरू केली आता थिकडे त्यांच्या गाडीवर तर लोखंडे आणि कमृध्दीन हे परमार यांच्या गाडीवर .मी त्यांना गाडीवर बसल्यावर अनेक वेळा बोललो की गाडी हळूहळू घ्या आपण पडू ,ते बोलले सर मी रोज या जनावरांसाठी या रोड ने येतो जातो .आणि पोटासाठी याच रोड ने मी रोज दूध नेतो कामशेतला. थिकडे थोडे भावनिक झाले होते .त्याच वेळी पाऊस पाडला आणि त्यांचे अश्रू त्यातच विरून गेले.
ते सांगत होते सर आज 4 दिवस झाले आहे,अजून नाही कोणी ही प्रशासनामधील , नाही कोणी ग्रामपंचायत मधील, की नाही कोणी नातेवाईक ,आज 4 दिवसातुन तुम्ही आज माझी विचापुस करायला आलात.त्यांच्या डोळ्यात खरोखर पाणी आले होते.ते खरंच या पुराशी एकटेच सामना करत होते .समोर होते घेतलेले ते उधारी चे अंभोण आणि विकत आणलेल्या त्या दुभत्या म्हैशी आणि त्याहीपेक्षा ते जनावरे जेव्हा त्या पावसात, त्या पाण्यात आणि त्या ओहळ मध्ये अडकले तेंव्हा त्यांना झालेल्या शेवटच्या मरण यातना ,किती त्रास झाले असेल सर? हे सगळे ते वर जाई पर्यन्त सांगत होते.मी फक्त ते सगळे निमूटपणे ऐकत होतो.विचार करत होते की जर या व्यक्तीला मदत नाही झाली तर?हा शेती करणे बंद करेल,त्याचा या व्यवस्थेवरचा विश्वासच उडेल आणि मग तो ही हेच म्हणेल की आपण आपल्या मुलांना घेऊन शहरात जाऊ.
खरंच असाच विचार करून कदाचित शेतकरी स्थलांतर करीत असेल आणि कदाचित आत्महत्या ही.
मंडळी, शासनाच्या अनेक योजना आहेत शेतकरी वाचावा म्हणून परंतु आळशी आणि निरुत्साही प्रशासन (जे खरंच प्रामाणिक ,योग्य आहे त्यांना दंडवत) यामुळे शेतकरी हा नेहमीच अडचणीमध्ये येतो.
आम्ही एका ठिकाणी जाऊन पोहोचलो थिकडे नी सांगितले की इथे ही एक म्हैस आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो परंतु चार दिवस झाल्याने त्या बॉडी चा खूप वास येत होता.थितडे यांनी खरंच अश्रू आवरले .वर जात असताना कमृध्दीन भाई दोनदा पडले.वाट निसरडी असल्यामुळे. शेवटी आम्ही खाली रोड वर आलो आणि त्यांची मी एक बातमीसाठी बाईट घेतली.ते खूप तळमळीने बोलत होते.खूप अपेक्षा ठेऊन बोलत होते.
बातमी प्रसिद्ध झाली त्यानंतर मात्र प्रशासन धावपळ करत त्याच्या पर्यंत पोहचले.
मंडळी, माझी प्रशासन मध्ये असलेले अधिकारी लोकांना विनंती आहे ,आपण अधिकारी नंतर आहोत पाहिले आपण एक माणूस आहोत, आणि त्या खुर्चीवर बसण्याच्या आधी तुम्ही ही एका शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असणार मग तो शेतकरी बाणा, ते शेतकरी रक्त, ते शेतकरी बद्दल असलेला कळवळा,ती आत्मीयता, ती प्रेम, माया ,बळीराजा म्हणून गौरवणारे ते मन कुठे गेलं.
का?तुम्ही गप्प का? अधिकारी मायबाप लावा ना तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही तुमचे अधिकार ,तुमची खुर्ची , तुमचे कौशल्य, तुमची हुशारी पणाला.
करा ना त्याला सक्षम. जगवा ना त्याला,
जागवा बळीराजा पुन्हा महाराष्ट्र देशात,
आज आपल्या समाजात असे किती बापू थितडे असतील.शोधा त्यांना आणि द्या त्यांना एक मायेचे आलिंगन
मग बघा ,तो कसा तुम्हाला ही भरभरून देईल.
शेत आणि शेतकरी, जगाचा पोशिंदा वाचला तरच मायबाप तुम्ही आम्ही वाचणार आहोत.
शेवटी एक वाक्य आठवते “स्वतःसाठी जगलास तर मेलास ….बाकी तुम्ही सज्ञान आहात पुढचे ओळखायला.



