ताज्या घडामोडी

वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी रवींद्र काकडे

Spread the love

वडगाव : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी रवींद्र काकडे यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

 

शुक्रवारी( 29 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजता नगरपंचायत कार्यालयात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्या उपस्थितीत शहर भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवींद्र काकडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

काकडे यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काकडे यांची त्यांच्या निवासस्थानापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, निवृत्ती शेटे, गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, भाजप वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे, गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर,मा. अध्यक्ष किरण भिलारे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!