आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस संध्याकाळी नवीन सुरू करा – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेबकुलकर्णी*

Spread the love

दिल्ली – सोलापुरातून संध्याकाळी सोलापूर हून पुण्याला जाण्यासाठी नवीन इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली

सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोनच्या पुढे कोणत्याही ट्रेन उपलब्ध नसल्याने सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे त्यामुळे सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी असल्याने त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे वाढते अपघात व इतर अडचणीमुळे नागरिकांना इतर संकटाचा सामना करावा लागत आहे. अभ्यासासाठी जाणारे विद्यार्थी नोकरीसाठी जाणारी युवक शेतकरी इतर नागरिकांची संख्या ही मोठी असल्याने सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री  ना रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सदर रेल्वे सुरू करण्याची मागणी केली
यावेळी बोलताना  नामदार .रावसाहेब दानवे पाटील यांनी सोलापुरातील रेल्वे प्रवाशांचे कौतुक करत नवीन सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे सुरू करू असे आश्वासन देखील यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!