ताज्या घडामोडी
प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी शिवशाहीचा पर्याय
सोलापूर : सोलापूर ते पुणे प्रवासासाठी खाजगी वाहने प्रवाशांकडून चारपट भाडे घेत असल्याने प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी सोलापूर आगारातून 10 शिवशाही बस भाडे तत्वावर सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती विभाग नियंत्रण विलास राठोड यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी कामबंद आंदोलन करत आहे. जवळपास 74 हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा प्रवासासाठी वापर करत आहे. खाजगी वाहने प्रवासासाठी दुप्पट ते चौपट भाडे आकारत आहेत. यामुळे प्रवाशांची लूट थांबवावी यासाठी शिवशाहीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.



