ताज्या घडामोडी

नवलाख उंबरेच्या सरपंचपदी सविता बधाले

Spread the love

नवलाख उंब्रे : नवलाख उंब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता बधाले या पाच मतांनी विजयी झाल्या आहेत. सरपंच चैताली यांनी पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती.

रिक्त जागेसाठी अध्यासी अधिकारी बाळासाहेब दरवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी आशा पंडित जाधव व सविता  रामनाथ बधाले यांचे दोन अर्ज आल्याने गुप्त पद्धतीने मतदान झाले. त्यामध्ये आशा जाधव यांना चार मते तर सविता बधाले यांना नऊ मते मिळाली. त्यामुळे अध्यासी अधिकारी दरवडे यांनी बधाले यांच्या नावाची घोषणा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!