आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हरिभाई देवकरण प्रशालेत संस्कृत दिन उत्साहात संपन्न…….!

Spread the love

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) हरिभाई देवकरण प्रशाला येथील मुळे सभागृह येथे संस्कृत दिन उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी प्रमुख पाहुणे शुभांगी कुलकर्णी (सहशिक्षिका ,मॉडर्न हायस्कूल) प्रशाला मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, सर्व पर्यवेक्षक,संस्कृत शिक्षक निखिल बडवे यांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख निखिल बडवे यांनी केले.प्रमुख पाहुणे शुभांगी कुलकर्णी यांचा परिचय श्रुतिका दोड्डी हिने केला. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांच्या हस्ते झाले. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून गीत,नाटक,भाषण, स्तोत्रे, नृत्य सादर केले.


प्रमुख पाहुणे शुभांगी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचे भविष्यातील स्थान तसेच व्यावसायिक संधी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देताना उपयोगात असणाऱ्यांची संख्या भरपूर असल्याचे सांगितले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का व पद्मिनी तर आभार दिव्या हिने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!