ताज्या घडामोडी

‘जय जय महाराष्ट्र माझा’ जयघोषात स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये ‘महाराष्ट्र दिन’ जल्लोषात साजरा 

Spread the love

तळेगाव दाभाडे: श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये आज रविवार दिनांक 01/ 05/2022 रोजी ‘महाराष्ट्र दिन’  ‘कामगार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका मा.सौ.शमशाद शेख मॕडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून झाली.

सदर कार्यक्रमाला शालेय मुख्याध्यापिका मा. सौ.शमशाद शेख मॅडम ; पर्यवेक्षिका सौ. रेणू शर्मा मॕडम ; प्राथमिक विभाग प्रमुख सौ. धनश्री पाटील ; पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सरोदे तेजस्विनी इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य सार्थक झाल्यासारखे आहे. प्रत्येकाला गर्व असावा असा आपला हा महाराष्ट्र!

छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , अनेक संत यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत असे वक्तव्य करून, महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून शालेय शिक्षिका सौ. जयश्री गायकवाड यांनी दिली यांनी .

सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका मा. शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका मा. रेणू शर्मा मॅडम यांनी केले.सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.संतोष खांडगे ,सचिव मा.श्री.मिलिंद शेलार सर , शालेय समिती अध्यक्षा मा. सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम आदींनी ‘महाराष्ट्र दिनाच्या’ व ‘कामगार दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या .

आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत , वैभवशाली इतिहास जपत ,प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!