ताज्या घडामोडी

इंदुरीकर महाराजांचा युवकांना सल्ला, म्हणाले नेत्यांच्या नादी लागून…..

सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडीवर आपल्या कीर्तनातून लोकांना दिला सल्ला..

Spread the love
इंदुरीकर महाराजांचा जनतेला सल्ला, म्हणाले नेत्यांच्या नादी लागून…..

इंदोरीकर महाराज म्हणाले की,’नेत्यांच्या नादी लागायचं आणि त्याच्या मुलाला गटप्रमुख करायचं, मग त्याच्या सुनेला तालुका प्रमुख करायचं. स्वत:ची आई मात्र शेतात घाम गाळतेय. शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त वापरलं जातेय. २०-२२ वर्षांची ही तरुण मुलं दिवसभर लोकांचा प्रचार करतायेत. स्वत:च्या करिअरवर लक्ष द्या. या नेत्यांच्या नादाला लागून आयुष्याची माती करु नका.’ असं म्हणत राज्यातल्या तरुण पिढीला इंदोरीकर महाराजांनी सल्ला दिला आहे.

दरम्यान त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, राज्यातील सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात रोज शाब्दिक युद्ध होताना दिसून येत आहे. तसेच राज्यात आता सर्व राजकीय पक्षाकडून लोकांशी संवाद साधल्या जात आहे. या सर्व परिस्थितीवरून इंदोरीकर महाराजांनी हे विधान केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!