ताज्या घडामोडी

तळेगाव नगरपरिषद कर्मचारी संघटनेने नोंदवला फेरीवाल्याच्या भ्याड हल्ल्याचा निषेध

Spread the love

तळेगाव : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव या फेरीवाल्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटून पडली. तर हल्ल्या दरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठी धावलेल्या सुरक्षारक्षकाचे एक बोट तुटले. या संतापजनक घटनेचा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून निषेध केला.

31 ऑगस्ट रोजी तळेगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व प्रशासकीय कामकाज काळ्या फिती लावून करण्यात आले. हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाही जायबंदी करतात अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!