ताज्या घडामोडी

पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून मुलीवर हातोडीने हल्ला

Spread the love

तळेगाव : तळेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणाने सतरा वर्षीय मुलीच्या डोक्यात हातोड्याने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.ही घटना काल घडली. मुलीला उपचारासाठी तात्काळ सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शिवम शेळके (वय 20 वर्षे, रा. तळेगाव स्टेशन) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर रूपी बँकेजवळ ही मुलगी दुचाकीवरुन जात असताना आरोपीने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी विरोधात तळेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती तो राग डोक्यात धरून आरोपीने हा हल्ला केला.

जखमीवर उपचार सुरू असून तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करीत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!