ताज्या घडामोडी
घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मंदिरे व सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली होणार
मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली होणार आहेत. तसेच सर्वधर्मीय प्रार्थना स्थळेही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यसरकार हळूहळू निर्बंध शिथिल करत आहे. 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तर 7 ऑक्टोंबर पासून मंदिरे व प्रार्थनास्थळे खुली होणार आहेत.
मागील दीड वर्षापेक्षा जास्त काळ बंद असणारे मंदिरांचे दरवाजे उघडले जाणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




