गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा….
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा….
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
आवाज न्यूज: पुणे, प्रतिनिधी ५ सप्टेंबर.

आज स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर आज गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक प्रशालेमध्ये शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गावर शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्यानंतर विद्यालयामध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सौ.पल्लवी परदेशी यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिंगटे सुधीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार रामभाऊजी मोझे साहेब यांच्याकडून प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिजिटल स्मार्ट बोर्ड शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्राथमिक विभागाला भेट देण्यात आला.
यातून त्यांनी स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शिक्षणाप्रती उत्साह कसा वाढवता येईल याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनावर आधारित कड सुनीता, देशमुख प्रतिभा, मोरे स्वाती, पवार रंजना यांनी कविता सादर केल्य.विद्यालयातील बालचमुंनी शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते सादर केली.
कार्यक्रमासाठी गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष : रामभाऊ मोझे साहेब, उपाध्यक्ष .ज्ञानेश्वर मोझे व शालेय समिती अध्यक्षा अलकाताई पाटील यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. पाठक मानसी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. माननीय मुख्याध्यापक शिंगटे सुधीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून आजचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला.



