ताज्या घडामोडी

बजरंग दल तळेगाव दाभाडे प्रखंडच्या वतीने दिपोत्सव साजरा

Spread the love

तळेगाव दाभाडे :  येथील बजरंग दल प्रखंडच्या वतीने सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार व सरसेनापती खंडेरावसाहेब दाभाडे सरकार यांच्या समाधिस्थळी भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला.

तळेगाव दाभाडे हे एक ऐतिहासीक शहर असून या शहराला प्राचिन काळापासून ऐतिहासीक वैभव लाभलेले आहे.प्रथम महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या स्मृतींची जपवणूक करण्याचे काम विश्व हिंदु परिषद बजरंग दलच्या वतीने  केली जात आहे असे व्यक्तव्य सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांचे वंशज सरसेनापती सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांनी केले.

शिवव्याखाते विनय दाभाडे यांनी सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या इतिहासाची थोडक्यात मांडणी केली.बजरंग दल पुणे जिल्हा सहसंयोजक बाळासाहेब खांडभोर यांनी बजरंग दलच्या मार्फत करीत असलेल्या उपक्रमांचा माहिती दिली.

बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे  प्रास्ताविक करताना, “महिला अबला नारी नसून सबला आहे याचे ज्वलंत उदाहरण त्याकाळी सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांनी दाखवुन दिले यांचेच जतन करून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कुठे तरी आळा बसावा यासाठी स्वयंस्फुर्तीने तयार होने गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. लक्ष्मण शेलार यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास जिल्हामंत्री महेंद्र आसवले, तळेगाव दाभाडे प्रखंड मंत्री कपिल देवाडिगा, बजरंग दल संयोजक ओंकार भेगडे, आकाश ठोंबरे, कुणाल जव्हेरी, हर्षद सांडभोर, विनोद (बंटि) भेगडे,प्रशांत भेगडे, योगेश शेटे, बजरंग कांबळे, ब्रिजेश चौहान, योगेश ढोरे, अमर जाधव सह बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!