गो- सेवक शांताराम सावंत यांना गोसंवर्धन पुरस्कार

चिंचवड: गोसेवक शांताराम सावंत यांना गोसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंकर जगताप यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.
तसेच वसुबारस निमित्त ईशा प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे यांच्या वतीने लक्ष्मीनगर चिंचवड येथे गोपूजन आयोजित करण्यात आले. तर केंद्राई गोशाला चिंचवड येथे महापौर माई ढोरे, उद्योजक व युवा नेते शंकर जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, कैलास बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण विभाग संयोजक माधव खोत, विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री नितिन वाटकर, भाजपा शहर सरचिटणीस संजय भंडारी, प्रशांत हरहरे, हरीभाऊ चिंचवडे, दत्त चिंचवडे, धनंजय गावडे, कैलास गावडे, सचिन साठे, दीपक गावडे, सुरेश बारणे, संजय येवले व केंद्राई गोशाळेचे सर्व सदस्य उपस्थित होते.





