* सोलापुरातील पोलीस कल्याण केंद्र सेवासदन शाळेसमोर 19 एप्रिल रोजी भीम महोत्सवाचे आयोजन…*

सोलापूर- भारतीय समाज सेवा संघ, सोलापूर या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने या वर्षी पाहिल्यांदाच भीम महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या दोन दिवसीय भीम महोत्सवान्तर्गत, ड्रीम पॅलेस पोलिस कल्याण केंद, सेवासदन शाळेसमोर, सरस्वती चौक, सोलापूर येथे दि.१९.४.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता, भंते सारीपुत्त यांच्या हस्ते ‘भीम बाजार’चे उदघाटन होणार असून, येथे दोन्ही दिवस या बाजाराची रेलचेल असणार आहे.
दि.२०.४.२०२४ रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळ्याने, या दोन दिवसीय भीम महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी श्रीमती प्रमिलाताई उबाळे (संस्थापिका, प्रेरणा सेवाभावी संस्था, सोलापूर) आणि श्री. सिद्धाराम चाबुकस्वार (संयोजक, दलित चेंबर ऑफ़ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तथा, यशस्वी उद्योजकीय प्रेरक व मार्गदर्शक, सोलापूर) असून, हैद्राबाद येथील चित्रपट निर्माते सत्यनारायण जाधव यांचे हस्ते या दोन्ही पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच, या सांस्कृतिक कार्यक्रमास मनिष केत (विश्ववार्ता चॅनेल ,सोलापूर) व राम गायकवाड सर (आदर्श शिक्षक) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या दोन दिवसीय भीम महोत्सवान्तर्गत आयोजित विविध उपक्रमांसाठी व ‘भीम बाजार’साठी नागरिकांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन, भीम महोत्सव संयोजन समितीच्या वतीने जयकर ठोंबरे सर व रमेश खाडे सर यांनी केले आहे.



