ताज्या घडामोडी

अखेर एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा मिटला

22 एप्रिल पर्यंत कामावर हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

Spread the love

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.तर कामावर रुजू होणार्‍या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई करू नये असे न्यायालयाने एसटी महामंडळाला बजावले आहे.तसेच एसटी कर्मचाऱ्यांना ही निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी या दोन्हीचा लाभ देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी झाली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे सर्व कर्मचारी संपावर आहेत.त्यामुळे राज्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मुख्यत ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. यासंदर्भात सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सविस्तरपणे निवेदन केले. त्याची दखल घेत न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!