ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये राबवले ‘स्वच्छता अभियान’.

ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली..

Spread the love

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये राबवले ‘स्वच्छता अभियान’.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, ५ ऑक्टोबर.

  श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये २ ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका मा.सौ. रेणू शर्मा मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.तेजस्विनी सरोदे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षिका सौ.सुजाता गुंजाळ यांनी केले.

भारताने जगाला शांतता व समता यांचा संदेश दिला. या शांतता व समतेचे उपासक महात्मा गांधी व भारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा असावा असे थोर देशभक्त लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी शाळेतील इ. ९वी ची विद्यार्थिनी श्रावणी गुंड हिने माहिती सांगितली. इ.२री मधील देवांशी स्वप्निल कुंभार आणि १ली मधील वेद देवा चव्हाण या विद्यार्थ्यांनी सुंदर असे वक्तृत्व सादर केले. शालेय शिक्षिका आयेशा सय्यद यांनी मधुर गीत सादर केले. बापूजींचे विचार विद्यार्थ्यांना समजावे याकरिता इ.८वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले.

शालेय मुख्याध्यापिका . शमशाद शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या *’भारत स्वच्छता अभियानाचा’* वारसा पुढे चालवत २ ऑक्टोंबर या दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळा व संपूर्ण परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका .शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका .रेणू शर्मा मॅडम सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका. गुंजाळ यांनी केले.

या स्तुत्य उपक्रमाचे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.संतोष खांडगे ,शालेय समिती अध्यक्षा .रजनीगंधा खांडगे मॅडम, उपाध्यक्ष  दादासाहेब उ-र्हे, सचिव  मिलिंद शेलार सर, कार्याध्यक्ष . बाळासाहेब शिंदे यांनी कौतुक केले *’देश स्वच्छ करूया; जीवन आदर्श बनवूया*’ असा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!