ताज्या घडामोडी

श्रीराम नवमीनिमित्त गवळीवाडा येथे बैलगाडा शर्यत व विविध कार्यक्रम

Spread the love

लोणावळा : श्रीराम नवमीनिमित्त गवळीवाडा येथे ता.८ शुक्रवारी भुशी येथील टाटा तलावात भव्यदिव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. ता.६ रोजी प्रिमियर लीग झाली..ता.७ रोजी श्रीरामचंद्र मुर्तींची प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिनानिमित्त सकाळी अभिषेक झाला.दुपारी जाखमाता भजनी मंडळ , सदापूर यांचे भजन झाले.

.ता.८ रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाला २१ हजार ते पाचवा क्रमांकाला सात हजार व फायनलसाठी गदा व चषक बक्षिसे ठेवली आहे. ता.९ रोजी होमहवन होईल.ता.१० रोजी सकाळी अभिषेक आणि ११.३० ता १२.३० श्रीराम जन्मावर आख्यान व पाळणा तसेच राञी श्रीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक होईल.ता.११ रोजी दुपारी पाच वाजता कुस्त्यांचा आखाडा होईल.. राञी ८ वाजता नखरेल नारी हा आॕर्केस्ट्रा होईल. व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्रीराम मारूती सेवा ट्रस्ट व श्रीराम मंडळांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!