ताज्या घडामोडी

शिलाटणे फाट्यावर मोटारसायकल ला कंटेनर ची धडक : माय लेकराचा जागीच मृत्यू , तर वाहनचालक जखमी.

वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा ग्रामिणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक माने हे करीत आहेत.

Spread the love

शिलाटणे फाट्यावर मोटारसायकल ला कंटेनर ची धडक : माय लेकराचा जागीच मृत्यू , तर वाहनचालक जखमी.

 आवाज न्यूज:लोणावळा प्रतिनिधी,  मच्छिंद्र मांडेकर , शिलाटणे फाट्यावर मोटारसायकल ला कंटेनर ची धडक : माय लेकराचा जागीच मृत्यू झाला ;तर वाहनचालक जखमी .झाला आहे.
आपघातात, पुष्पा पवन शर्मा (वय -२६ ) आणि मुलगा युवराज पवन शर्मा ((वय- 3 वर्षे,दोघेही रा. सनावडा नागोर, जि राजस्थान , थाना गच्चीपुरा 341504 संध्या रा कृष्णानगर , निगडी, पुणे ) अशी मृतांची नावे आहे.
लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून, मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकलवार व फिर्यादी पवन गणपतलाल शर्मा (वय-२७ ) हे पत्नी व मुला सह जुने मुंबई पुणे हायवे रोड वरुन पुणे बाजुकडे जात असताना शिलाटणे गावचे हद्दीत किरण सोसायटी समोर कंन्टेनर क्रमांक एम एच ४६,बी एफ ५८३३ वरील वरील चालकाने त्याचे ताब्यातील कंन्टेनर अती वेगाने हयगईने चालवुन फिर्यादी चालवत असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच १४,जे झेड १९८४ हिस पाठीमागुन धडक दिली. त्यात फिर्यादीस गंभीर जखमी करुन अपघातात फिर्यादी यांच्या पत्नी, पुष्पा पवन शर्मा व मुलगा युवराज पवन शर्मा , रा -निगडी , पुणे ) यांचे मृत्यूस कारणीभुत होउन अपघाताची खबर न देता निघुन गेला. या आपघातात जखमीस खाजगी रूग्णालयात दाखल केले , तर आपघाताचा पंचनामा करून मरण पावलेल्या माय लेकरांची उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघाताबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं-११५/२२ नुसार भा.द.वि.कलम . ३०४,(अ),२७९,३३७,३३८,४२७,मोटार वेहीकल आॕक्ट १८४,१७७,/१३४ ब नुसार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक पळून गेला आहे.
फिर्यादी पवन गणपतलाल शर्मा, ( वय -२७ वर्षे, व्यवसाय ट्रन्सपोर्ट, रा. सनावडा नागोर जि राजस्थान ,तालुका – गच्चीपुरा 341504 संध्या रा कृष्णानगर निगडी ,पुणे) ,
ता.२७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास जुने मुबई पुणे हायवे मार्गावरुन पुणे बाजुकडे जात असताना शिलाटणे गावचे हद्दीत किरण सोसायटी समोर हा आपघात घडला.
गुन्ह्यातील जखमी पवन गणपतलाल शर्मा यांचे फिर्यादीवरून कंन्टेनर वरील आनोळखी चालकाने त्याचे ताब्यातील नमुद कंन्टेनर अती वेगाने हयगईने चालवुन फिर्यादी चालवत असलेली मोटर सायकल हिस पाठीमागुन धडक देउन त्यात फिर्यादीस गंभीर जखमी करुन अपघातात फिर्यादी यांच्या पत्नी पुष्पा शर्मा, व मुलगा युवराज शर्मा ( रा- निगडी पुणे ) यांचे मृत्यूस कारणीभुत होउन अपघाताची खबर न देता निघुन गेला ; म्हणुन त्याचे विरोधात फिर्याद दिली.या मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोट मा. कोर्टात रवाना करण्याची तजविज ठेवली असुन, वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा ग्रामिणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक माने हे करीत आहे. त्यांना सहाय्यक पोलिस नाईक, करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!